Prince Philip Dies At 99 | राणी एलिझाबेथ (II) आणि प्रिन्स फिलिप यांच्या सहजीवनाच्या प्रवासातील काही खास क्षण
ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांचे पती प्रिंस फिलिप यांचं शुक्रवारी निधन झालं. ते 99 वर्षांचे होते. लंडनमधील बकिंघम पॅलेसनं याबाबत अधिकृत माहिती दिली. प्रिन्स फिलिप यांना ड्यूक ऑफ एडिनबर्ग असंही म्हटलं जायचं. प्रिंस फिलिप यांच्या निधनानं ब्रिटनमध्ये शोककळा पसरली आहे. ब्रिटनच्या ऐतिहासिक इमारतींवरील ध्वज त्यांच्या सन्मानार्थ खाली उतरवले आहेत. तसेच राष्ट्रीय शोक देखील जाहीर करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रिन्स फिलिप यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 16 फेब्रुवारीला लंडनच्या किंग एडवर्ड सप्तम हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं होतं. 16 मार्च रोजी त्यांना दवाखान्यातून सुट्टी मिळाली होती. मात्र त्यांच्यावर हृदयरोगासंदर्भात उपचार सुरु होते. अशात शनिवारी सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
प्रिन्स फिलिप यांचा जन्म 10 जून 1921 ला झाला होता.
वयाच्या 18 व्या वर्षी ते ब्रिटीश राजघराण्याच्या नौदलात सहभागी झाले. त्याचवेळी राजकुमारी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांच्यातील नात्याची सुरुवात झाली.
दुसऱ्या विश्व युद्धात प्रिन्स फिलिप, ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांनी केलेल्या कर्तृत्त्वानंतर त्यांना किंग जॉर्ज (VI) यांच्याकडून राजकुमारी एलिझाबेथ यांच्याशी विवाहबंधनात अडकण्याची परवानगी मिळाली.
20 नोव्हेंबर 1947 ला हा शाही विवाहसोहळा पार पडला.
किंग जॉर्ज VI यांच्या निधनानंतर राजकुमारी एलिझाबेथ यांनी राजकारभाराची धुरा सांभाळली. प्रिन्स फिलिप यांची पत्नी राजकुमारी एलिझाबेथ इंग्लंडची राणी झाली, त्यानंतर 1952 मध्ये ब्रिटीश सैन्यातून बाहेर प़डल्यानंतर ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांना 1957 मध्ये ब्रिटीश प्रिन्स हे मानाचं पद बहाल करण्यात आलं.
राणी आणि प्रिन्स यांना चार मुलं आहेत. प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स, प्रिन्सेस रॉयल अॅने, ड्यूक ऑफ यॉर्क प्रिन्स एन्ड्र्यू आणि प्रिन्स एडवर्ड एर्ल ऑफ वेसेक्स अशी त्यांची ओळख.
प्रिन्स फिलिप यांना क्रीडाप्रकारांची विशेष आवड होती. ब्रिटीश राजघराण्यातील सर्वाधिक काळ जगलेले पुरुष म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी राजगराण्यातील जबाबदाऱ्यांपासून निवृत्ती घेतली. (सर्व छायातित्रं सौजन्य- @theroyalfamily/Instagram)