Ganesh Photo on Note : मुस्लिम बहुसंख्य देशाच्या नोटेवर गणेशाचा फोटो, इंडोनेशियाच्या नोटेची खरी कहाणी, वाचा सविस्तर...
अशात इंडोनेशिया देशाच्या चलनी नोटा चर्चेत आल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या देशाच्या नोटेवर गणपतीचा फोटो कसा आला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचं कारण असं की, या देशावर पूर्वी अनेक हिंदू राजांनी राज्य केलं होतं. त्यामुळे तेथील संस्कृतीवर हिंदू धर्माचा मोठा प्रभाव आहे. यामुळेच येथे अनेक हिंदू मंदिरं आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडोनेशिया देशावर चोला साम्राज्य होतं. त्यानंतर मुघल आणि डच शासकांनीही येथे सत्ता काबीज केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रामुख्याने हिंदू आणि बौद्ध धर्मीय असलेल्या या प्रदेशाला इंडोनेशिया अशी स्वतंत्र ओळख मिळाली.
1945 साली इंडोनेशियामध्ये पहिली चलनी नोट छापण्यात आली. त्याआधी येथील व्यवहार नाण्याच्या चलनांवर अवलंबून होता.
नाण्यांच्या कमतरतेमुळे आणि त्यांच्या तुलनेने व्यवहार अधिक सोपा व्हावा यासाठी नोटा छापण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याकाळात 50, 100,500, 200 आणि हजार अशी रुपयाह (Rupiah - इंडोनेशियाचं चलन) चलनी नाणी वापरात होती.
सुरुवातीला सरकारने 10 सेन आणि 25 सेन या चलनी नोटा (सेन हे इंडोनेशियामधील पुरातन चलन आहे) छापण्यात आल्या.
मात्र या 10 आणि 25 सेनमुळे छोटे-मोठे व्यवहार करणं कठीण जातं होतं म्हणून सरकारने 1/2, एक, दोन 1/2 आणि पाच सेन अशा नोटा चलनात आणल्या.
इंडोनेशियाचा 20000 रुपयाह या चलनी नोटोवर गणेशाचा फोटो आहे. यामागे एक रंजक कथा सांगितली जाते ती अशी की, 1997 साली इंडोनेशियासह जगातील अनेक देश आर्थिक संकटात होते. याकाळात सरकारला कुणीतरी कल्पना दिली होती की जर आपण नोटोवर श्री गणेशाचा फोटो वापरला तर आपल्यावरील आर्थिक संकट मिटेल. यानंतर गणपतीचा फोटो असणारी 20000 रुपयाहची नोट पहिल्यांदा 1965 साली छापण्यात आली होती आणि 2018 पर्यंत चलनात होती. सध्या ही नोट चलनात नाही.
या नोटेमागचा दुसरा अंदाज असा लावला जातो की, गणपती ही बुद्धी आणि कलेची देवता आहे. तसेच या नोटोवर बाजूला स्वातंत्र्य सेनानी हजर देवंतारा यांचा फोटो आहे. इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रात देवंतारा यांचा मोठा वाटा आहे. यामुळे या नोटेवर गणपती आणि देवंतारा याचा फोटो असल्याचं मानलं जातं.
इंडोनेशिया देशामध्ये रामायण, महाभारत आणि गरुड पुराण यांना विशेष महत्त्व आहे. म्हणूनच या देशाचं राष्ट्रीय चिन्ह गरुड आहे. इंडोनेशियाच्या प्रत्येच चलनावर गरुडाचं चिन्ह आहे. जसं भारतीय चलनावर राष्ट्रीय चिन्ह सिंह आहे.
सध्या इंडोनेशियामध्ये 500, 1000, 2000, 5000, 10000, 20000, 50000 आणि 100000 रुपयाह या नोटा चलनात आहेत.
भारतीय एक रुपया (Rupee - Indian Currency) म्हणजे 188.65 इंडोनेशियन रुपयाह (Rupiah - Indonesian Currency)
इंडोनेशिया हा मुस्लिम बहुसंख्य देश आहे. या देशात सुमारे 80 टक्क्यांहून अधिक लोक मुस्लिम धर्मीय आहेत. पण इथे सर्व हिंदू आणि मुस्लिन बांधव एकोप्याने राहतात. सुरुवातीला इंडोनेशियामध्ये हिंदू आणि बौ्द्ध धर्मीय लोकसंख्या होती. पण अरबेकडून व्यापारी या देशात व्यापारासाठी आले त्यानंतर इथे मुस्लिम लोकसंख्या वाढत गेली. मात्र इथे लोक आजही हिंदू संस्कृती आणि धर्माला खूप मानतात. येथील अनेक परंपरा हिंदूप्रमाणे आहेत.
(Photo Credit : या बातमीतील सर्व फोटो विकीपीडियावरून (WikiPedia) घेतले आहेत.)