PM Modi France Visit: राष्ट्रपती मॅक्रॉन यांना सितार, तर पंतप्रधान एलिझाबेथ यांना मार्बल टेबल; फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान मोदींकडून खास गिफ्ट
13 आणि 14 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न, फ्रान्सच्या नॅशनल असेंब्ली स्पीकर येले ब्रॉन-पिव्हेट, फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन, फ्रेंच सिनेटचे जेरार्ड लॉचर यांना वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेंच नॅशनल असेंब्लीचे स्पीकर याएल ब्रॉन-पिवेट यांना हातानं विणलेला 'सिल्क काश्मिरी कार्पेट' भेट दिला. काश्मीरचे हातानं विणलेले रेशमी गालिचे त्यांच्या मऊपणा आणि कारागिरीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत.
पंतप्रधान मोदींनी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांना 'मार्बल इनले वर्क टेबल' भेट दिली. संगमरवरी बनवलेल्या सर्वात आकर्षक कलाकृतींपैकी एक म्हणजे संगमरवरी इनले वर्क.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांना चंदनाच्या पेटीत पोचमपल्ली सिल्क इकत साडी भेट दिली.
याशिवाय पीएम मोदींनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना चंदनाची सतार भेट दिली आहे. चंदनावर नक्षीकाम करण्याची कला शतकानुशतकं विकसित झाली आहे.
फ्रान्सच्या सिनेटचे जेरार्ड लॉर्चर यांनाही पंतप्रधान मोदींनी एक खास भेट दिली. ही भेट म्हणजे चंदनाच्या लाकडावर हातानं कोरलेली मूर्ती.
यासोबतच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी प्रॉस्ट यांची कादंबरी आणि शार्लेमेन बुद्धिबळपटूंची प्रतिकृतीही पंतप्रधानांना भेट दिली. मॅक्रॉन यांनी पंतप्रधानांना 1916 साली फ्रेम केलेलं चित्रही भेट दिलं.