PM Modi France Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याचा दुसरा दिवस, बॅस्टिल डे परेडमध्ये विशेष अतिथी म्हणून उपस्थिती
तसेच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह त्यांनी विशेष अतिथी म्हणून बॅस्टिल डे परेड या समारंभाला देखील त्यांनी उपस्थिती दर्शवली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपॅरिसमधील बॅस्टिल डे परेडमध्ये पंजाब रेजिमेंटने देखील सहभाग नोंदवला.
फ्रान्सच्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने म्हणजेच 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, मला फ्रान्सच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान सगळ्या 140 कोटी भारतीयांचा आहे.
भारत आणि फ्रान्स यांच्यात 90 हजार कोटींचा संरक्षण करार झाला आहे.या संरक्षण कराराअंतर्गत भारताला फ्रान्सकडून 26 राफेल-एम ही समुद्री लढाऊ विमानं मिळणार आहेत.
भारत आणि फ्रान्स यांच्यात UPI संदर्भात करार झाला आहे. त्यामुळं आता भारतीयांना फ्रान्समध्ये UPI द्वारे रुपयात पैसे देता येणार आहेत.
या करारामुळे भारतीय नवनिर्मितीसाठी एक मोठी नवी बाजारपेठ खुली होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.
मार्सेल या शहरामध्ये नवीन भारतीय वाणिज्य दूतावास सुरु करणार असल्याची माहिती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली आहे.
राष्ट्राअध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'पाहून मला अभिमान वाटत आहे. आम्ही एका ऐतिहासिक विश्वासाच्या आधारावर पुढे जात आहोत.'