Turkey Syria Earthquake : भूकंपग्रस्तांसाठी भारताचं 'ऑपरेशन दोस्त', NDRF पथकाकडून युद्धपातळीवर बचावकार्य; मृतांचा आकडा 21 हजारांवर
तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) विनाशकारी भूकंप (Earthquake) झाला आहे. भूकंपामुळे आतापर्यंत सुमारे 21 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रशासन मदत आणि बचावकार्यामध्ये गुंतलं आहे. अनेक भागांत अद्याप मदतीचं साहित्य पोहोचलेलं नाही. भारताने संकटात सापडलेल्या तुर्कीला मदतीचा हात दिला आहे.
भूकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीसाठी भारताने मदतीचा हात दिला आहे. 'ऑपरेशन दोस्त'द्वारे (Operation Dost) भारत भूकंपग्रस्त भागात मदत पोहोचवत आहे.
भूकंपग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या तीन पथकांना विशेषत: श्वानपथक, वैद्यकीय आणि इतर आवश्यक उपकरणांसह भारतातून तुर्कीला पाठवण्यात आलं आहे.
NDRF ची पथकं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना दिसत आहेत. तुर्कस्तानमधील हताया (Hatay) येथे भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.
एनडीआरएफचे पथक तुर्कीमधील नूरदगी येथे शोध आणि बचाव कार्य करत आहेत.
भूकंपामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफची पथकं विशेषत: श्वानपथक, वैद्यकीय आणि इतर आवश्यक उपकरणांसह तुर्कीमध्ये मदत आणि बचावकार्य राबवत आहेत.
तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत.
भूकंपामुळे येथील हजारो घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकून सुमारे 21000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
अद्यापही ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मात्र हवामान बदलामुळे यामध्ये अडथळे येत आहेत.