Green Comet : अवकाशात दिसला हिरवा धुमकेतू, 50 हजार वर्षानंतर दिसलं अदभुत दृष्यं
नुकतंच अंतराळामध्ये एक अद्भुत दृश्य पाहायला मिळालं आहे. 50 हजार वर्षांनंतर एक धुमकेतू (Comet) पृथ्वीच्या (Earth) जवळून गेला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखगोलप्रेमींसाठी ही एक पर्वणी होती. कारण हा धुमकेतून याआधी 50 हजारपूर्वी पाषणयुगात पृथ्वीजवळून गेला होता, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.
खगोलप्रेमींसह वैज्ञानिकांमध्ये देखील याबाबत मोठी उत्सुकता आहे.
50 हजार वर्षानंतर पृथ्वीच्या जवळून हिरव्या रंगाचा धूमकेतू गेला आहे. लडाखमधील हानले येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सच्या (IIA) शास्त्रज्ञांनी हिरव्या धूमकेतूचे फोटो टिपले आहेत.
यासाठी खास दुर्बिणीचा वापर करण्यात आला. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, नेमकी हीच घटना निएंडरथल मानवाच्या काळात घडली घडली होती, तेव्हा अंतराळ विज्ञान याबाबतची माहिती सुद्धा नव्हती.
अंतराळ शास्त्रज्ञांनी या हिरव्या रंगाच्या धूमकेतूचा शोध मार्च 2022 मध्ये लागला. या धूमकेतूला C/2022 E3 (ZTF) असे नाव देण्यात आले आहे.
कॅलिफोर्नियाच्या झ्विकी ट्रान्झियंट फॅसिलिटीच्या शास्त्रज्ञांनी मार्च 2022 मध्ये हा धूमकेतू शोधला आणि तेव्हापासून ते या धूमकेतूचा मागोवा घेत आहेत.
शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, या धूमकेतूला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास बराच वेळ लागतो. यावेळी हा धूमकेतू पृथ्वीपासून सुमारे 26 दशलक्ष मैल दूर गेला.
शास्त्रज्ञांच्या मते, हिरव्या धूमकेतूला सूर्याभोवती त्याची कक्षा पूर्ण करण्यासाठी हजारो वर्षे लागतात.
याआधी हा धूमकेतू 50 हजार वर्षाआधी दिसला होता. यानंतर हा धूमकेतू कधी दिसेल हे सांगता येत नाही.