Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
72 प्रवाशांचं शेवटचं उड्डाण... लँडिंगच्या केवळ 10 सेंकदांपूर्वीच प्लेन क्रॅश, फोटोंमध्ये पाहा अपघाताचं भीषण वास्तव
यति एअरलाइन्सच्या ATR-72 विमानानं काठमांडूहून पोखरा येथून उड्डाण केलं. या 72 सीटर विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते, म्हणजेच एकूण 72 लोक होते. विमान पोखराजवळ पोहोचलं होतं की, लँडिंगच्या अवघ्या 10 सेकंद आधीच ते कोसळलं. नेपाळमधील मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, पोखराचे जुने देशांतर्गत विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हा अपघात झाला. हा अपघात सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अपघाताच्या चौकशीसाठी सरकारनं पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. अपघाताची माहिती मिळताच नेपाळचे पंतप्रधान प्रचंड (Pushpa Kamal Dahal) स्वत: पोखरा येथे रवाना झाले होते. परंतु सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे घटनास्थळी पोहोचू कलं नाही. यानंतर पंतप्रधान प्रचंड यांचा पोखरा दौरा रद्द करण्यात आला.
विमान अपघात हा हवामानामुळे झाला नसून तांत्रिक बिघाडामुळे झाला असल्याचं नेपाळच्या विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे. विमानाच्या पायलटनं लँडिंगसाठी एटीसीकडून परवानगी घेतल्याचंही विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे. पोखरा एटीसीलाही लँडिंगसाठी ओके सांगण्यात आलं होतं, अशी माहिती नेपाळच्या विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.
नेपाळच्या या पोखरा विमानतळाचं उद्घाटन अवघ्या 14 दिवसांपूर्वी झालं होतं. हा अपघात दिवसा 11 वाजून 10 मिनिटांनी झाला. हे विमान पोखरा खोऱ्यातील सेती नदीच्या घाटात कोसळलं. या दुर्घटनेतील ज्या मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही, त्यांचे मृतदेह डीएनए चाचणीसाठी हेलिकॉप्टरद्वारे काठमांडूला पाठवण्यात येणार आहेत.
या विमानात 5 भारतीय नागरिकांसह 14 परदेशी प्रवासी होते. नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलीस, नेपाळ पोलीस तसेच स्थानिक नागरिक बचाव कार्यात गुंतले आहेत.
नेपाळच्या सुप्रसिद्ध लोकगायिका नीरा चंत्याल याही विमानात होत्या. गायिका नीरा चंत्याल पोखरा येथे आयोजित एका मैफिलीत सहभागी होणार होत्या. अशा स्थितीत नीरा चंत्याल यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. महिनाभरापूर्वी नीरा चंत्याल यांनी त्यांचा नवा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला होता. त्या सोशल मीडियावर फारशा सक्रिय नव्हत्या. मात्र त्या गाण्याचे व्हिडीओ यूट्यूबवर शेअर करायच्या.
एअर होस्टेस ओसीन आले हिचाही विमान अपघातात मृत्यू झाला आहे. Tiktok वरील तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. विमान प्रवासात तिनं हा व्हिडीओ बनवला होता. विमानात हसत हसत व्हिडीओ बनवणाऱ्या ओसीन आलेनं कधीच विचार केला नसेल की, असा एक दिवस येईल की, तिला विमान अपघातात या जगाचा निरोप घ्यावा लागेल. या व्हिडीओमध्ये विमानात ती एकटी दिसत आहे.
अपघातग्रस्त विमानाच्या को-पायलट अंजू खतिवडा यांचं को-पायलट म्हणून हे शेवटचं उड्डाण होतं. विमानाचे सुरक्षित लँडिंग करून अंजू कॅप्टन म्हणून रुजू होणार होत्या. यासाठी त्या सीनियर पायलट आणि ट्रेनर कमल केसीसोबत फ्लाइटमध्ये रुजू होत्या. फ्लाइंग कॅप्टन होण्यासाठी किमान 100 तासांचा फ्लाइंग अनुभव आवश्यक आहे. को-पायलट अंजू यांनी याआधीही नेपाळच्या जवळपास सर्व विमानतळांवर यशस्वीपणे लँडिंग केलं होतं. रविवारी पोखराला उड्डाण करताना कॅप्टन केसी यांनी त्यांना मुख्य वैमानिकाच्या सीटवर बसवलं. यशस्वी लँडिंगनंतर, अंजूला मुख्य वैमानिकाचा परवाना मिळणार होता, परंतु दुर्दैवानं, अंतरापासून अवघ्या 10 सेकंदांपूर्वी, सर्व स्वप्नं आणि इच्छा अधुऱ्या राहिल्या आणि विमान दुर्घटनेत अंजू यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
1 जानेवारी 2023 रोजी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. याशिवाय, ज्या विमानाचा अपघात झाला त्याच विमानाचे डेमो फ्लाइट उद्घाटनाच्या दिवशी करण्यात आलं होतं. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.
यती एअरलाइन्सनं दिलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी रोजी यती एअरलाइन्सची सर्व नियमित उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान, आपत्कालीन आणि बचाव उड्डाणं पुन्हा सुरू होतील.
(PHOTO : PTI)