Gold Rate : जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
Gold Rate : भारतात सोनं खरेदी करणाऱ्या लोकांची कमी नाही. अनेकांना सोनं खरेदी करण्याची इच्छा असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBahikhata.org..अनुसार दुबईमध्ये सर्वात स्वस्त सोने मिळते. सर्वात स्वस्त सोनं मिळण्याचं ठिकाण म्हणूनही दुबईची ओळख आहे.
दुबईमध्ये सोने खरेदीवर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. त्यामुळेच अन्य देशांपेक्षा दुबईमध्ये सोनं स्वस्त असल्याचे बोलले जाते.
दुबईनंतर हाँगकाँगमध्येही सोने खरेदीवर कोणताही अतिरिक्त कर लावण्यात येत नाही. त्यामुळे हाँगकाँगमध्येही सोने तुलनेने स्वस्त मिळत असल्याचे बोलले जाते.
याशिवाय सिंगापूरमध्ये सोने खरेदीवर कमीत कमी कर आकारला जातो. त्यामुळे सिंगापूरमध्येही सोने स्वस्त मिळत असल्याचे बोलले जाते.
सिंगापूरमधील मरीना बे आणि ऑर्चर रोडसारखे सोन्याचे बाजार स्वस्तात खेरदी करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे अनेक लोक सिंगापूरमध्येही सोने खरेदी करतात.
युरोपातील स्वित्झरलँड असा चौथा देश आहे, जिथे स्वस्ता सोने खरेदी करता येऊ शकते.
स्वित्झरलँडने सोने आयात करण्यावर कोणतेही कर लादलेले नाहीत. त्यामुळे अनेक लोक स्वित्झरलँडमध्येही सोने खरेदी करण्यास पसंती देत असतात.
भारत जगातील पाचवा असा देश जिथे स्वस्त दरात सोने खरेदी केले जाऊ शकते.
भारतात धार्मिक उत्सव सुरु असताना मुंबई आणि मोठ्या बाजारांमध्ये स्वस्त दरात सोने मिळू शकते.
शिवाय काही राज्यात सोन्यावरील कर कमी करण्यात येतो, तिथेही स्वस्त दरात सोने खेरदी करता येऊ शकते.