Ganeshotsav Celebration : परदेशातही गणेशोत्सवाची धूम, आफ्रिकेतील नायजेरियामध्ये 'लागोसच्या राजा' चा थाट वेगळा
नायजेरियामधील लोगास शहरात महाराष्ट्र मंडळ रेसिडेन्शिअल असोसिएशन ऑफ नायजेरिया यांच्याकडून गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणात प्रत्येकाच्या घरात आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत.
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात आणला. आज भारताबाहेरही गणेशोत्सव साजरा केला जातोय.
आफ्रिकन देश असलेल्या नायजेरियात सार्वजनिक पद्धतीने भारतीय नागरिकांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे.
नायजेरिया देशातील लोगास शहरात महाराष्ट्र मंडळ रेसिडेंशियल असोसिएशन ऑफ नायजेरिया यांनी मनोभावे गणरायाची मूर्ती आणून विधिवत पूजाही केली.
यावेळी मोठया प्रमाणात नायजेरियात नोकरीनिमित्त असलेल्या मराठी बांधवांनी एकत्र येत आरती सुद्धा केली.
दिवसेंदिवस परदेशातील गणेशोत्सव अधिक लोकप्रिय होऊ लागला आहे.
भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याची नाळ ही नेहमीच त्याच्या मातीशी जोडलेली असते याचे हे उत्तम उदाहण आहे
कोरोना महासाथीच्या आजाराचे संकट काही प्रमाणात दूर झाल्याने यंदाचा गणेशोत्सव उत्साहाने पार पडत आहे.
'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' अशा जयघोषात काल (31 ऑगस्ट) गणेशाचं स्वागत करण्यात आले आहे