Deadliest Lake : तलाव की नरकाचं दारं? एका रात्रीत 1746 जणांचा मृत्यू, कारण जाणून बसेल धक्का
Lake Nyos The Bad Lake : जगात एक अशी जागा आहे, ज्याला मृत्यूचं सरोवर असं म्हटलं जातं. इथे एका रात्रीत हजारोंचा जीव गेला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे मृत्यूचं वास्तव्य आहे. काही ठिकाणांना नरकाचं दार असंही म्हटलं जातं.
आफ्रिकेतील कॅमेरूनमध्ये असेच एक ठिकाण आहे. हे जगभर 'द बॅड लेक' (The Bad Lake) म्हणून ओळखलं जातं.
या तलावाच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या तलावात असुरांचा वावर असतो. त्यामुळे सूर्यास्तानंतर कोणीही त्याच्या जवळ जात नाही.
1986 मध्ये एक विचित्र घटना घडली ज्यामध्ये तलावाने 1746 लोकांना आपला बळी बनवलं.
आफ्रिकेच्या स्थानिक भाषेत या तलावाला 'लेक न्योस' (Lake Nyos) म्हणतात. हे तलाव ज्वालामुखीच्या विवरावर आहे. त्यामुळे या तलावात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त आहे.
या तलावात असलेले कार्बन डायऑक्साइड म्हणजे जणू मृत्यू असं म्हटलं जातं.
या कार्बन डायऑक्साइडमुळेच 'लेक न्योस' मृत्यूचं तलाव मानलं जातं. या कार्बन डायऑक्साइड गॅसमुळे एकाच दिवसात हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला.
21 ऑगस्ट 1986 रोजी या तलावात मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड जमा झाला होता. यानंतर या गॅसमुळे स्फोट झाला आणि हा वायू तलावाभोवती पसरला.
आजूबाजूला कार्बन डायऑक्साईड पसरल्याने 1746 लोकांचा जीव गेल्याचे सांगितं जातं. याशिवाय सुमारे 3500 जनावरांचाही या वायूमुळे मृत्यू झाल्याचं म्हटलं जातं.