China Corona : चीनमध्ये मृत्यूचं तांडव; कोरोनामुळे दररोज सुमारे 9000 जणांचा मृत्यू
चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यूचं तांडव सुरु आहे. याबाबत एका अमेरिकन संशोधन संस्थेचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्रिटनमधील संशोधन संस्था एअरफिनिटी रिसर्च फर्मच्या हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेना हा दावा केला आहे. एअरफिनिटी संस्थेच्या अहवालानुसार, चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 हून अधिक लोक कोरोनामुळे आपला जीव गमावत आहेत.
तसेच या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्येच कोविड संसर्ग वेगाने पसरू लागला होता. या रिपोर्टनुसार, चीनमध्ये दररोज नऊ हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये पुन्हा कोरोना विषाणू पसरण्यास सुरुवात झाली. पण नोव्हेंबर महिन्यात बीजिंगने आपले झिरो कोविड धोरण शिथिल करत कोरोना निर्बंध हटवले.
एअरफिनिटी फर्मच्या मते, चीनमधील सुमारे 9,000 लोक दररोज कोविड-19 मध्ये आपला जीव गमावत आहेत.
यानंतरच चीनमध्ये तेथे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. सध्या चीनमधील कोरोना संसर्गाचं प्रमाण खूप वाढलं आहे.
चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची लागण होत आहे. परिणामी आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे.
चीनमध्ये रुग्णालयामध्ये खाटाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे.
अहवालानुसार, जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत चीनमध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक पाहायला मिळणार आहे. जानेवारी महिन्यात चीनमधील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचेल.
एअरफिनिटी फर्मने एका निवेदनात म्हटले आहे की, 1 डिसेंबरपासून चीनमध्ये 18.6 दशलक्ष लोकांना कोरोना संसर्ग होऊन एकूण मृत्यूची संख्या एक लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.