Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Niagara Falls : सुप्रसिद्ध नायगारा धबधबा गोठला; अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा, हाडं गोठवणारी थंडी
अमेरिकेतील तापमान शून्याखाली मायनिस डिग्रीवर पोहोचले आहे. यामुळे जगप्रसिद्ध नायगारा धबधबाही गोठला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनायगारा धबधबा गोठल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हा धबधबा जणू आर्क्टिक खंडाचा भाग दिसत आहे, पाणी गोठल्यामुळे येथे फक्त पांरा शुभ्र बर्फ दिसत आहे. अमेरिकेतील हिमवादळामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.
अमेरिकेतही कडाक्याची थंडी पडली आहे. नाताळच्या दिवशी अमेरिकेमध्ये हिमवादळ (Blizzard) धडकले. शनिवारी आणि रविवारी अमेरिकेतील (America) अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी पाहायला मिळाली.
यामुळे अमेरिकेतील अनेक भाग गोठले. बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
जागोजागी अनेक फूट उंच बर्फाचे डोंगर पाहायला मिळत आहेत. यामुळे अनेकांचा जीवही गेला आहे. अमेरिकेतील तापमान मोठ्या प्रमाणात घसरले असून प्रसिद्ध नायगारा धबधबाही (Niagara Falls) गोठला आहे.
द न्यूयॉर्क पोस्ट (The New York Post) वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, नायगारा धबधब्याचा काही भाग गोठला आहे. हा धबधबा पूर्णपणे गोठलेला नाही.
नायगारा धबधब्याचा काही भाग गोठला असून. काही भागातून पाणी वाहत आहे. नायगारा धबधब्यातील दर सेकंदाला 3,160 टन पाणी 32 फूट उंचीवरून खाली पडते.
नायगारा धबधबा (Niagara Falls) जगभरातील सर्वात मोठा आहे. हा धबधबा कोट्यवधी पर्यटकांचे आकर्षण आहे. नायगारा धबधबा अमेरिकेतील नायगारा नदीवर असून अमेरिका आणि कॅनडा ह्या देशांच्या हद्दीवर आहे.