Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Queen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल!
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनानंतर (Queen Elizabeth II Death) त्यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल झालं आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील. महाराणी एलिझाबेथ यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं
त्या 96 वर्षांच्या होत्या. तब्बल 70 वर्षे ब्रिटनवर राज्य केल्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांनी स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला
त्यानंतर त्यांचं पार्थिव विमानाद्वारे ब्रिटनमध्ये दाखल झालं असून त्यांच्यावर सोमवारी राजेशाही इतमामात अंतसंस्कार करण्यात येतील
त्यांचं पार्थिव लंडनमधील ( London) विंडसर येथील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफन करण्यात येईल
मंगळवारी संध्याकाळी रॉयल एअरफोर्सच्या विमानानं त्यांचं पार्थिव लंडनमध्ये आणण्यात आलं.
क्वीन एलिझाबेथ यांचं पार्थिव इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी जनसमुदाय लोटला आहे.
महाराणीचं पार्थिव बकिंगहॅम पॅलेसमध्ये (Buckingham Palace)ठेवण्यात आली आहे.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं पार्थिव 19 सप्टेंबर रोजी विंडसर, लंडन येथील किंग जॉर्ज IV मेमोरियल चॅपल येथे दफन केलं जाईल.
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाच्या बातमीने जगावर शोककळा पसरली आहे