Queen Elizabeth II Visited India : सात दशकात तीन वेळेस भारत दौरा; पाहा राणी एलिझाबेथ यांचे फोटो
एलिझाबेथ यांचा ब्रिटनची महाराणी म्हणून 1952 मध्ये राज्याभिषेक झाला होता. त्यावेळी त्या अवघ्या 25 वर्षांच्या होत्या. ब्रिटनची महाराणी म्हणून त्यांनी तीन वेळेस भारत दौरा केला होता.
Queen Elizabeth II Visited India
1/9
महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि त्यांचे पती प्रिन्स फिलीप हे तीन वेळेस भारत दौऱ्यावर आले होते. त्यांचा भारत दौरा हा 1961, 1983 आणि 1997 साली झाला होता. भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी त्यांचे स्वागत केले होते.
2/9
1961 च्या दौऱ्यात महाराणी एलिझाबेथ या भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्यादेखील होत्या. पहिल्या दौऱ्यात त्यांनी महात्मा गांधी यांची समाधी असलेल्या राजघाटवर जाऊन आंदरांजली अर्पण केली होती.
3/9
महाराणी एलिझाबेथ यांनी 1961 च्या भारत दौऱ्यात मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाचा दौरा केला होता.
4/9
1961 मधील दौऱ्यात वाराणसीला भेट दिली होती. त्यावेळी महाराणी एलिझाबेथ यांनी अंबारीमधून स्वारी केली होती.
5/9
महाराणी एलिझाबेथ यांनी आपल्या भारत दौऱ्यात आग्रा येथील ताज महालला भेट दिली होती.
6/9
महाराणी एलिझाबेथ यांचा दुसरा भारत दौरा 1983 मध्ये झाला. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे स्वागत केले होते.
7/9
या दौऱ्यात एलिझाबेथ यांनी थोर समाजसेविका मदर तेरेसा यांना ब्रिटिश सरकार देत असलेल्या अवॉर्ड ऑफ मेरिटने सन्मानित केले होते.
8/9
महाराणी एलिझाबेथ यांचा शेवटचा भारत दौरा हा 1997 मध्ये झाला. राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी महाराणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप यांचे स्वागत केले होते.
9/9
1997 मध्ये भारतीय स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली होती. एलिझाबेथ यादेखील स्वातंत्र्यच्या सुवर्णमहोत्सवात सहभागी होत्या.
Published at : 09 Sep 2022 11:00 AM (IST)