Britain PM Rishi Sunak : भारताचे जावई ब्रिटनचे पंतप्रधान, भारताबद्द्ल प्रेम आणि क्रिकेटची आवड, पाहा ऋषी सुनक यांचे काही खास फोटो
ऋषी सुनक ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान आहेत. 42 वर्षीय ऋषी सुनक यांना क्रिकेट खेळायला आवडतं. पाहा त्यांचे काही खास फोटो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. ब्रिटनच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या व्यक्तीची पंतप्रधानपदी निवड झाली आहे.
ऋषी सुनक हे यॉर्कशायरचे खासदार असले तरी भारत त्यांच्या हृदयात आहे. सुनक यांनी ब्रिटीश संसदेत भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती. असं करणारे ते ब्रिटनचे पहिले खासदार होते.
ऋषी सुनक यांना मंदिरात जायला आवडतं. सुनक यांनी त्यांच्या एका विधानात म्हटलं होतं की, भगवद्गीता अनेकदा तणावाच्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यास मदत करते. सुनक त्यांची पत्नी आणि दोन मुलींसह बंगळुरूमध्ये सासरच्या मंडळींना भेटायला येतात.
ऋषी सुनक यांची गणना ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. त्याची एकूण संपत्ती 700 दशलक्ष पौंडांपेक्षा जास्त आहे. त्यांचं ब्रिटनच्या यॉर्कशायरमध्ये घर असून त्यांची पत्नी अक्षता यांची केन्सिंग्टन, लंडनमध्येही मालमत्ता आहे.
ऋषी सुनक यांना कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत. मुली आमच्यासाठी वरदान आहेत, असं सुनक यांनी म्हटलं आहे.
सुनक हे 2015 मध्ये रिचमंड मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि 2017 आणि 2019 मध्ये ते पुन्हा निवडून आले.
सुनक यांना तंदुरुस्त राहायला आवडतं म्हणून त्यांना क्रिकेट, फुटबॉल खेळणं आणि चित्रपट पाहायला आवडतं.
ऋषी सुनक यांचा जन्म 12 मे 1980 रोजी ब्रिटनमधील साउथॅम्प्टन जनरल हॉस्पिटलमध्ये झाला. सुनक हे वडील यशवीर आणि आई उषा यांचं पहिलं अपत्य आहेत.
ऋषी सुनक यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला, त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच मंदिरात जाण्याची सवय आहे. साउथॅम्प्टनमधील हिंदू वैदिक सोसायटी मंदिराशी ते इतके जोडलेले आहेत. त्यांचे आजोबा राम दास सुनक हे या मंदिराचे संस्थापक सदस्य होते.