Rishi Sunak : नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनक आहेत ब्रिटनचे सर्वात श्रीमंत खासदार
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून त्यांनी इतिहास रचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डंटचा पराभव करून विजय मिळवला आहे.
ऋषी सुनक यांच्या समर्थनार्थ 185 हून अधिक खासदार आहेत. तर पेनी मॉर्डंट यांना केवळ 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला.
औपचारिक घोषणेनंतर ऋषी सुनक हे 28 ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात आणि 29 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते.
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे नाव देखील होते. मात्र त्यांनी आपले नाव मागे घेतल्याने सोमवारी ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व हाती घेण्याची शक्यता अधिक वाढली.
ऋषी सुनक यांचे आई-वडील मूळचे भारतीय आहेत. त्यांचा जन्म 12 मे 1980 रोजी साउथम्प्टन, इंग्लंड येथे झाला.
त्यांच्या भारतीय कनेक्शनबद्दल सांगायचे झाले तर, ऋषी सुनक यांचे आजी-आजोबा भारतातून आफ्रिकेत स्थायिक झाले होते. त्यानंतर त्याचे वडील आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थायिक झाले.
ऋषी सुनक यांचे आजोबा पंजाबमधून टांझानियाला गेले. यानंतर त्याच्या आईचे कुटुंब टांझानियाहून ब्रिटनमध्ये गेले. त्याच्या आई-वडिलांनी ब्रिटनमध्येच लग्न केले.
ऋषी सुनक हे 42 वर्षांचे असून त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीसोबत लग्न केले आहे.
ऋषी सुनक हे पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ब्रिटनचे ते सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत आणि त्यांची संपत्ती 7300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.