Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमधील भूकंपातील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 2053 जणांचा मृत्यू
भुकंपामुळे 9,000 हून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती तालिबान प्रशासनाने रविवारी दिली आहे. हा अफगाणिस्तानच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंपापैकी एक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहेरात शहराच्या वायव्येस 35 किमी (20 मैल) अंतरावर भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल होती, अशी माहिती यूएस भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) ने दिली आहे.
यूएस भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम अफगाणिस्तानमध्ये सहा भूकंपाचे धक्के बसले. त्यातील 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप सर्वात शक्तिशाली होता.
फराह आणि बादघिस प्रांतातील काही घरेही अंशत: उद्ध्वस्त झाली असल्याची माहिती तालिबान सरकारने दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंदा जान आणि घोरियान जिल्ह्यातील 12 गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे प्रवक्ते जनान सॅक यांनी सांगितलं की, आजच्या भूकंपात हेरातच्या 'जिंदा जान' जिल्ह्यातील तीन गावांमध्ये सुमारे 15 लोकांचा मृत्यू झाला आणि 40 जण जखमी झाले आहेत.
आतापर्यंत मृतांच्या आकडा 2000 पार गेला असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
याआधी जून 2022 मध्ये अफगाणिस्तानमध्ये शक्तिशाली भूकंप आला होता, ज्यामध्ये 1000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता, तर 1500 हून अधिक लोक जखमी झाले होते.