PHOTO : तालिबानच्या राजवटीतील अफगाणिस्तानचा पहिला दिवस कसा होता?
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सत्तेत आल्यानंतर पहिलाच दिवस महिलांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणारा ठरला. त्यांच्यावर अनेक बंधने लागली असून पहिल्याच दिवशी तालिबान्यांनी शहरांतील ब्युटी पार्लर आणि सौदर्य प्रसाधनांच्या दुकानावरील महिलांचे फोटो फाडून टाकले. फोटोतील महिलांनी बुरखा घातला नाही असं तालिबान्यांचं मत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतालिबानी दहशतवाद्यांनी काबुलमध्ये भर रस्त्यावर बंदुकी घेऊन गस्त घालायला सुरुवात केली.
शहरात ठिकठिकाणी तालिबान्यांचे अशा प्रकारचे चित्र दिसू लागले आहेत.
तालिबान्यांच्या नियंत्रणानंतर काबुलमध्ये अनेक रस्त्यांवर शांतता पसरली आहे. मार्केट, स्थानिक दुकाने ही तालिबानच्या मंजुरीनंतरच उघडणार आहेत.
अफगाणी नागरिक मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक लोकांनी तर उड्डाण घेतलेल्या विमानांना लटकण्याचा प्रयत्न केला.
ज्या लोकांना विमानात प्रवेश करता आला नाही त्या लोकांनी विमानाच्या विंगेला पकडून बसण्याचा प्रयत्न केला.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत असं दिसतंय की काही लोकांनी विमानाला लटकून प्रवास करण्याचा प्रयत्न केला आणि आपला जीव गमावला.