10 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बाउंसरने झाला होता फिलिप ह्यूजचा मृत्यू
क्रिकेट मैदानावर होणाऱ्या विक्रमाची चर्चा नेहमी मोठया प्रमाणात होत असते, परंतु काही वेळेस अशी काही दुर्दैवी घटना घडते कि ती कायम स्वरूपी लक्षात राहते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App24 नोव्हेंबर 2014 रोजी फिलिप ह्यूजला सीन एबॉटच्या एक बाउंसरने दुखापत झाली.
फिलिप ह्यूजने हेल्मेट घातले असताना देखील बॉल त्याचा डाव्या कानाच्या खालील ठिकाणी लागला त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.
क्रिकेट मैदानावरुन स्ट्रेचरच्या मदतीने त्याला बाहेर नेण्यात आले होते. त्यानंतर सिडनीच्या हॉस्पिटलमध्ये तो तीन दिवस मृत्यूशी झुंज देत होता.
अखेर 27 नोव्हेंबर 2014 ला आणि त्याचा जन्मदिनाच्या अवघ्या तीन दिवसा अगोदर फिलिप ह्यूज मृत्यशी झुंज देताना अपयशी ठरला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वयाच्या 25 व्या वर्षी ह्यूज ने जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण क्रिकेट जग हळहळले होते.
ऑस्ट्रेलियाच्या लहान शहरातील एक सामान्य मुलगा म्हणून ह्यूजने त्याचा क्रिकेट करीययमध्ये सरुवात केली होती.
टी-20, एकदिवसीय आणि कसोटी संघात त्याने आपले स्थान मिळवले होते.