बाई काय हा प्रकार...? वडिलांच्या चितेच्या राखेपासून सिगारेट बनवून ओढते 'ही' मुलगी; सर्वांसमोर खळबळजनक खुलासा
पण जर तुम्हाला येऊन कोणी असं सांगितलं की, काही लोक वडिलांची चितेची राख घेऊन त्यापासून सिगारेट करुन ओढतात, तर तुमचा विश्वास बसेल?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे उघड आहे की, त्या व्यक्तीबद्दल ना तुमच्या मनात चांगले विचार असतील ना तुमच्या मनात त्याची चांगली प्रतिमा असेल. एक मुलगी तिच्या वडिलांच्या चितेच्या राखेपासून सिगारेट ओढते.
या मुलीनं स्वतः एका पॉडकास्ट दरम्यान, हे कबूल केलं आहे. यामगाचं कारण आहे, तिच्या वडिलांची शेवटची इच्छा.
एक मुलगी असं करते, तिचं नाव रोसन्ना... असं करण्यामागचं कारण सांगताना रोसन्ना सांगते की, तिचे वडील एक विद्रोही व्यक्ती होते आणि त्यांची इच्छा होती की, त्यांच्या शरीराच्या राखेसोबत वेगळं काहीतरी करावं. रोसन्नाच्या वडिलांचा मृत्यू 5 वर्षांपूर्वी ल्युकेमियामुळे झाला होता.
मृत्यूपूर्वी तिच्या वडिलांनी इच्छा व्यक्त केलेली की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेची राख मातीत मिसळून एक मारिजुआनाचं झाड लावलं जावं.
यानंतर रोझना आणि तिच्या आईनं तंबाखूचं उत्पादन करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्यानंतर घरातच पित्याच्या चितेची राख मातीत मिसळून रोप लावलं.
रोप चांगलं बहरलं आणि त्यानंतर त्या पानांपासून सिगारेट तयार करुन रोसन्ना ओढू लागली.
रोसन्ना सांगते की हा क्षण तिच्यासाठी खूप भावनिक होता आणि तिनं तिच्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केल्याचा तिला आनंद आहे.
(वरील वृत्त केवळ मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे देत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)