Vidarbha Shri : विजय भोयर ठरला ‘विदर्भ श्री’; अमरावतीच्या पठ्ठ्यानं मारली बाजी
Vidarbha Shri Vijay Bhoyar : वाशीम येथे पार पडलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत अमरावतीच्या विजय भोयरनं 'विदर्भ श्री'चा किताब पटकावला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भ बॉडी बिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन वाशीम जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशन आणि स्व. मन्नासिंह ठाकूर बहुउद्देशीय संस्था वाशिम यांच्याद्वारे संचालित फिटनेस झोन हेल्थ क्लबच्या वतीनं विदर्भ स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
वाशिमच्या जिल्हा क्रिडा संकुलनावर ‘विदर्भ श्री’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या स्पर्धेत विदर्भातील 11 जिल्हयांमधील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. मोठ्या संख्येनं 'बॉडी बिल्डर्सनी' या स्पर्धेत सहभागी झाले होते.
‘विदर्भ श्री’ या मुख्य किताबासाठी 80 किलो वजनी गटातील अमरावती येथील विजय भोयर हा विदर्भ श्री ठरला.
60, 65, 70 आणि 75 किलो वजनी गटात विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांचा प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
‘विदर्भ श्री’ विजय भोयरला 25,000 रूपयांच्या रोख पारितोषिकांसह सन्मान चिन्हानं गौरवण्यात आलं.
उकृष्ट शरीर प्रदर्शन करत विजय भोयरनं 'विदर्भ श्री'चा किताब मिळवला.
आतापर्यंत विजय भोयरनं विविध बॉडी बिल्डींग स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे.