Watermelon : कलिंगडाचे दर घसरले, बळीराजा संकटात
सध्या कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कारण कलिंगडाच्या दरात (Watermelon Price) मोठी घसरण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकलिंगडच्या दरात घसरण झाल्यानं मोठा फटका तळकोकणातील शेतकऱ्यांना बसत आहे. दर नसल्यामुळं शेकडो टन कलिंगड शेतातच पडून आहेत.
सध्या प्रतिकिलोला तीन ते पाच रुपयांपर्यतचा दर मिळत आहे. बाजारात मागणीपेक्षा जास्त उत्पादन देखील झालं आहे, याचा परिणाम दरांवर होत असल्याचं चित्र दिसत आहे.
गोवा बाजारपेठेत कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आवक झाली आहे. याचा परिणाम दरावर होत आहे.
तळकोकणात कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. दर पडल्याने सिंधुदुर्गात (Sindhudurg) शेकडो टन माल शेतात पडून आहे. मागणीपेक्षा जास्त उत्पादन आणि गोवा बाजारपेठेत कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात कलिंगड आले आहे.
दर नसल्यामुळं बाजारात कलिंगड नेऊन काय करणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळं कलिंगड शेतातच पडून आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. त्यामुळं भविष्यात कलिंगड लागवडीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे.
कलिंगडाचे उत्पादन हे 75 ते 80 दिवसांमध्ये मिळते. त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात कलिंगड लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.
दरवर्षी कलिंगडला 12 ते 15 रुपये किलोचा दर मिळत असतो. यावर्षी मात्र, कलिंगडाला प्रति किलोसाठी 3 ते 5 रुपयांचा दर मिळत आहे.
शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलिंगडाचे उत्पादन घेतलं जातं. गोव्यात कलिंगडाची मोठी बाजारपेठ आहे.