Shravan Somvar : श्रावण सोमवारनिमित्त पितळेच्या वस्तूंपासून महादेवाच्या पिंडीला सजावट, पदमेश्वर संस्थानमध्ये भाविकांची मोठी गर्दी
श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवारच्या निमित्ताने विविध भगवान महादेवाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिमच्या पदमेश्वर संस्थानमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
त्याचं कारण म्हणजे पितळेश्वराचं रुप या महादेवाच्या पिंडीला म्हणजेच (लिंगाला) देण्यात आलं होता.
विविध पितळाच्या साहित्यापासून भव्य अशी सजावट करुन या मूर्तीला सजवण्यात शृंगार करण्यात आलं होतं.
श्रावण महिन्यात दर सोमवारी रात्रीला विविध वस्तूच्या माध्यमातून शृंगार केल्यानंतर महाआरती होत असते.
पदमेश्वर संस्थानमध्ये महादेवाचे पुरातन मंदिर आहे
या मंदिरात पदमेश्वर मंडळाद्वारे गेल्या काही वर्षांपासून विविध माध्यमातून या मंदिराची विविध वस्तूच्या माध्यमातून सजावट करतात.
पहिला श्रावण सोमवार असल्याने पितळेश्वर नावाने पितळाचा शृंगार करत महादेवाच्या पिंडीला सजवण्यात आले.
जवळपास या मंडलाने 500 किलो विविध पितळाच्या धातूपासून या मंदिराची भव्य अशी सजावट केली होती.
ही सजावट पाण्यासाठी वाशिमकरांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालं