Nagpanchami 2023: जेजुरी गडावर नागपंचमीचा उत्साह; म्हाळसा देवीचे पारंपरिक ताट, पाहा फोटो
जेजुरी गडावर नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपंचमीनिमित्त रूढी परंपरेनुसार गुरव, कोळी, वीर, घडशी समाजाच्या महिलांनी म्हाळसाबाईचं ताट काढून नागोबा मंदिराभोवती फेरा धरला.
महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर नागपंचमीनिमित्त रूढी परंपरेनुसार पूजापाठ करण्यात आला.
परंपरेनुसार, नागोबाची पूजा करण्यासाठी म्हाळसा देवीचं ताट काढलं जातं.
त्याच प्रमाणे दुपारी मंदिरात पूजा अभिषेक करून महिलांनी वाजत गाजत म्हाळसा देवीचं ताट काढलं.
त्यानंतर मंदिरासमोर फुगडी, फेर धरून महिलांनी पारंपरिक गीतं गायली.
गुरव, वीर, कोळी, घडशी पुजारी सेवक वर्ग आणि शहरातील महिलांनी या उत्सवात सहभाग घेतला होता.
सनई, ढोलाच्या नादात जेजुरीचा आसमंत बहरुन निघाला.
भंडाऱ्याची उधळण करत जेजुरी गड पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला.
जेजुरी गडावर पूजा करुन महिलांनी नागपंचमी सण साजरा केला.