Bail Pola 2023: वाशिममध्ये बैलपोळ्यानिमित्त बाजारपेठ्या सजल्या
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो.
या सणाला शेतकरी त्यांच्या एकूणच परिवारासाठी अंत्यत उत्साह असतो.
महाराष्ट्रासह , विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो.
यावर्षी 14 सप्टेंबरला गुरुवारी बैलपोळ्याचा सण साजरा केला जाणार आहे.
वाशिममध्ये बैलपोळ्याची लगबग सध्या वाशिमच्या पाटणी चौकात सुरू आहे.
मोठ्या प्रमाणात बैलांच्या साहित्याची दुकाने सजली आहेत.
शेतकऱ्यांची या दुकानांवर लगबग वाढली आहे.
चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात आषाढ पौर्णिमेला बेंदूर साजरा केला जातो.