Kutch Tourism: गुजरातला जात असाल तर कच्छचे रण नक्की पाहा; मनाला भुरळ घालतील 'हे' फोटो
कच्छचे रण भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात आहे. कच्छचे रण गांधीधामपासून 108 किलोमीटर अंतरावर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकच्छचे रण हा एक खारट दलदलीचा, मिठाने आच्छादलेला भाग आहे.
कच्छचा वारसा आणि संस्कृती देशात आणि जगभरात पोहोचावा म्हणून गुजरात पर्यटन विभागाने 'रण उत्सव' देखील सुूरू केला आहे.
येथे रण उत्सव नोव्हेंबर ते मार्चपर्यंत चालू राहतो.
पर्यटकांची उत्तम निवड म्हणून कच्छला प्रसिद्धी मिळाली.
कच्छच्या रणात उंट आणि घोड्यांच्या पाठीला रंगीबेरंगी कपड्यांनी सजवलं जातं. जेणेकरुन पर्यटकांना आरामदायी आणि शाही सवारीचा अनुभव मिळावा.
चांदण्या रात्री या ठिकाणचं सौंदर्य बघण्यासारखं असतं.
पौर्णिमेच्या रात्री येथील मिठाची जमीन अशी चमकते, जणू पृथ्वीवर लखलखीत तारे पसरले आहेत.
कच्छचे रण दिवसा पूर्णपणे पांढरे दिसते, जणू पृथ्वी आणि आकाश एकत्र झाले आहेत.
मोकळे आकाश, थंड वारा आणि मोठं रण हे सर्व मिळून या ठिकाणाचं सौंदर्य स्वर्गासारखं बनवतात.