Tadoba National Park : तप्त उन्हात वाघोबा जलक्रीडेत मग्न...
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (Tadoba) असंच एक जंगल. या जंगलाबद्दल कुणाला माहिती नाही अशी माणसं दुर्मिळच.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपूर आणि मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) सीमेवर वसलेलं हे जंगल सर्वात महत्त्वाच्या जंगलांपैकी एक.
राज्यातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी आहे.
प्राचिन काळात या परिसरावर गोंड आदिवासी लोक रहायची, गोंड राजाची या ठिकाणी सत्ता होती.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला असून तापमानाचा पारा 43 अंशांच्या घरात गेलाय...
उन्हाच्या या वाढत्या काहिलीने मनुष्यासह वन्यप्राण्यांनादेखील त्रास सहन करावा लागतोय...
उन्हाच्या याच काहिली पासून सुटका करून घेण्यासाठी ताडोबातील एक वाघोबा मनसोक्त पाण्यात बुडून जलक्रीडेचा आनंद घेताना दिसला...
चंद्रपूरचा ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात असलेल्या कोलारा बफर भागातील हे छायाचित्रे आहेत
भद्रावती येथील डॉ.विवेक शिंदे सफारी साठी गेले असताना त्यांनी वाघोबाच्या या जलक्रीडा आपल्या कॅमेरात कैद केल्या..
ताडोबातील वाघांमुळे देश-विदेशातील पर्यटक ताडोबाकडे आकर्षित झालेले पाहायाला मिळते