Salman Khan : टायगर जखमी है! 'Tiger 3'च्या शूटिंगदरम्यान सलमान खानला दुखापत
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाईजान सध्या 'टायगर 3' या सिनेमाचं शूटिंग करत असून या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.
सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गंभीर दुखापतीबाबत माहिती दिली आहे.
'टायगर 3'च्या सेटर भाईजानला गंभीर दुखापत झाली आहे.
सलमानला नेमकी कशामुळे दुखापत झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सलमानने पाठमोरा फोटो शेअर करत लिहिलं आहे,जेव्हा तुम्हाला वाटतं की संपूर्ण जगाचा भार तुमच्या खांद्यावर आहे त्यावेळी जगाला सोडा आणि पाच किलोच्या डंबेलचे वजन उचलून दाखवा... टायगर जखमी आहे.
सलमानच्या आगामी 'टायगर 3' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
सलमानचा 'टायगर 3' हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या सिनेमांप्राणे 'टायगर 3'ला प्रेक्षकांची पसंती मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सलमानचा 'टायगर 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.