Bail Pola : उद्या बैल पोळा, वर्ध्यात लाकडी नंदी बैलाच्या किंमतीत वाढ
विदर्भात बैलपोळ्याच्या सणाला तान्हा पोळा किंवा नंदी पोळा म्हणतात. विदर्भात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्ध्यात नंदी पोळ्यासाठी लाकडी बैल विक्रीला सुरुवात झाली आहे.
लाकडी नंदी बैलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. लाकूड मिळत नसल्याचा परिणाम किंमतीवर झाला आहे.
विदर्भात मोठ्या उत्साहात तान्हा पोळा साजरा केला जातो. सद्या बाजारात मोठ्या प्रमाणात सागाच्या लाकडापासून तयार करण्यात आलेले नंदी विक्रीस आले आहे.
नंदी बनवायला आवश्यक असणारे सागाचे लाकूड पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्यानं नंदी बैलाच्या किंमतीत वाढ झाली आहे.
एक बैलाची किंमत दोनशे रुपयापासून तर पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढली आहे. किंमत वाढली तरीही पालकांची लाकडी बैल खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैलपोळ्याच्या सणाला विशेष महत्व आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो.
पोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी साहित्यांनी सजल्या आहेत.
विदर्भात या सणाला तान्हा पोळा किंवा नंदी पोळा म्हणतात. विदर्भात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो.