Rose Shrikhand: गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा खास रेसिपी; आरोग्यासाठीही फायदेशीर
गुलाब श्रीखंड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप घट्ट दही, 1 कप साखर, 1 कप गुलाबाच्या पाकळ्या
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुलाब श्रीखंड आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि खाण्यातही मज्जा येते. तुम्ही पूजेत भोग म्हणून हे श्रीखंड बनवू शकता, तर याची रेसिपी पाहूया.
ही रेसिपी बनवण्यासाठी प्रथम एक वाडगं घ्या, त्यात कॉटन कपडा अंथरुन घ्या आणि मग त्यात घट्ट दही टाका.
हे दही कॉटन कपड्यात 8 ते 10 तास बांधून ठेवा.
आता आपला चक्का तयार झाला असेल.
आता मिक्सरच्या भांड्यात जेवढं दही असेल तेवढीच साखर आणि गुलाबाच्या पाकळ्या घ्याव्यात आणि ते मिश्रण बारीक करुन घ्यावं.
साखर आणि गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर दह्यात छान जाड क्रीम येईपर्यंत चांगली मिक्स करा.
तुमचं श्रीखंड तयार आहे, या श्रीखंडात तुम्ही गुलाब इसेन्स देखील घालू शकता. तयार झालेलं श्रीखंड वाडग्यात काढून फ्रिजमध्ये ठेवा.यानंतर थंड झालेलं श्रीखंड सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवून सर्व्ह करा.