OBC Reservation : ओबीसीच्या मुद्द्यावर BRS आक्रमक, भारत राष्ट्र समितीचा वर्ध्यात पहिलाच मोर्चा
ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीनं वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे मोर्चा काढण्यात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात पहिल्यांदाच भारत राष्ट्र समिती पक्ष ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर समुद्रपूर येथे रस्त्यावर उतरली आहे.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावं, कंत्राटी पद्धतीने नोकरभरतीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी मोर्चेकरांनी केली.
सोयाबीनच्या नुकसानीची हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी यावेळी मोर्चातून करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यात ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु ओबीसींना विविध क्षेत्रात अद्याप न्याय मिळत नाही असं निवेदनात म्हटलं आहे.
कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करून काही कंत्राटदारांचे चांगभलं करण्याचं काम सध्या सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
देशात अजूनही ओबीसींची जनगणना करण्यात आली नाही. एकीकडे दरवर्षी जनावरांची जनगणना केली जाते पण माणसांची जातनिहाय जनगणना करायला सरकारकडे वेळ नाही असा आरोप यावेळी बीआएसचे नेते डॉ. उमेश वावरे यांनी केला.
भाजप तसेच सत्ताधारी पक्षात अनेक नेते हे ओबीसी आहेत, पण या नेत्यांना ओबीसी समाजाच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचंही ते म्हणाले.
भारत राष्ट्र समितीचे नेते डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोर्चात सहभागी झाले. मोर्चात हातात पोस्टर आणि मी ओबीसी लिहिलेल्या टोप्या घालून सहभागी झालेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते.
समुद्रपूर येथील विद्या विकास विद्यालयापासून हा मोर्चा समोर निघाला, शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा तहसील कार्यालय येथे पोहचला.
विविध घोषणा देत मोर्चात नागरिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.