Best Milk Drinking Time : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? याेग्य वेळी दूध पिल्यास मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे
स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी दूध पिणे फार महत्वाचे आहे. दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आयुष्यभर हाडे मजबूत ठेवते. शरीराला ऊर्जा देण्यासोबतच आजारांपासूनही संरक्षण करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा असंख्य फायद्यांमुळे अनेक लोक नियमित दूध पितात. मात्र अनेक लोकांना नियमीत दूध पिऊन देखील फायदे मिळत नाहीत. याचे कारण असू शकते चुकीच्या वेळी दूध पिणे.
दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? आरोग्यासाठी काय फायदे आहेत? कोणत्या समस्यांपासून आपण आराम मिळवू शकतो? हे जाणून घेऊयात.
सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे चांगले? अर्थात यावर लोकांची वेगवेगळी मते आहेत, पण डाॅक्टर रात्री दूध पिण्याचा सल्ला देतात. रात्री दूध प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. त्यामुळे शरीर दुधातून जास्तीत जास्त कॅल्शियम शोषून घेते. मात्र, दिवसभरातही दूध प्यायल्यास काहीही नुकसान होत नाही.
डॉक्टरांच्या मते, रिकाम्या पोटी दूध पिणे टाळावे. कारण रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि गॅस होऊ शकतो. अशा परिस्थितीत पचनाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असलेल्यांना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
लहान मुले कधीही दूध पिऊ शकतात. यामुळे त्यांना दिवसभर ऊर्जा मिळते आणि त्यांच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा होतो. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात दूध महत्त्वाची भूमिका बजावते.
दिवसाऐवजी रात्री दूध पिणे अधिक फायदेशीर आहे. अशा स्थितीत रात्री नियमित दूध प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.
नियमित दूध पिणे ही एक चांगली सवय आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील स्नायू आणि हाडे मजबूत होतात. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्ही प्रौढ असाल तर रात्री दूध पिणे जास्त फायदेशीर ठरेल.
दूध प्यायल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. दूध कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे, जे दातांच्या समस्या टाळतो.
काही लोकांना थोडेसेही शारीरिक काम केले तरी थकवा जाणवू लागतो. अशा लोकांसाठी दुधाचे सेवन हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही नियमितपणे दुधाचे सेवन केले तर तुम्ही दीर्घकाळ एनर्जीने परिपूर्ण राहाल.