Nashik Ganesh Darshan : नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला, देखावे पाहण्यासाठी नाशिककरांची प्रचंड गर्दी
नाशिक शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. मुंबई,पुण्यानंतर नाशिकला गणेश उत्सवाचा एक वेगळाच आनंद अनुभवयास मिळतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये आजही गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी दुपारनंतर प्रचंड गर्दी केली आहे.
नाशिक शहरातील बाजारपेठांमधील सगळे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. त्यात आज पावसाचे वातावरण असले तरीही असल्याने मोठ्या संख्येने गणेश भक्त दर्शनासाठी बाहेर पडले आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवात मोठा उत्साह पाहायला मिळत असून अनेक मंडळांनी नवनवे देखावे सादर केले असून नाशिककरांची मोठी गर्दी होत आहे.
आज सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने नागरिक देखावे दर्शनाचा सुपर मंडे अनुभवत आहे. सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत.
नाशिकच्या रविवार कारंजावरील केदारनाथ मंदिर देखावा दर्शनासाठी भाविकांची विशेष गर्दी होत असल्याने गर्दीवर नियंत्रण राखणे मुश्कील होत आहे.
नाशिककर कुटुंबियांसह नाशिक गणेश दर्शनासाठी शहरात गर्दी करत असून नागरिक बच्चे मंडळींना खांद्यावर घेऊन देखाव्यांचा आनंद घेत आहेत.
प्रामुख्याने शहरातील मेनरोड, जुने नाशिक, पंचवटी परिसरात नागरिक देखावे पाहण्यासाठी नाशिककरांची प्रचंड गर्दी होत असल्याने गर्दीला आवरणे मंडळांना कठीण जात आहे.
नाशिक शहरातील अशोक स्तंभ परिसरात अशोक स्तंभ मित्रमंडळाने यंदाही सुंदर असा देखावा साकारला आहे.
नाशिक शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. मुंबई,पुण्यानंतर नाशिकला गणेश उत्सवाचा एक वेगळाच आनंद अनुभवयास मिळतो. (सर्व फोटो : महेश बडाख)