PHTOTO : बोर व्याघ्र प्रकल्पात कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ अस्वल!
वर्ध्याच्या सेलू तालुक्यात असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ अस्वल आढळून आलं आहे. हे अस्वल बोर व्याघ्र प्रकल्पातच जन्मल्याचं वनरक्षकाकडून सांगितलं जात आहे. कारण अस्वलाच्या लहानपणीचेही दृश्य इथल्याच कॅमेरात कैद असून आता अडीच ते तीन वर्षांचं झाल्यावरही वनरक्षकांच्या कॅमेरात कैद झालं आहे. (PHOTO : मनेशकुमार सज्जन, वनरक्षक, बोर व्याघ्र प्रकल्प)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App19 मे 2022 रोजी बोरमध्ये फिकट तपकिरी रंगाचं दुर्मिळ ल्युसिस्टिक स्लॉथ बिअर आढळून आलं. महाराष्ट्रात मेळघाट व्याघ्र प्रकल्पानंतर दुसऱ्यांदा आढळलेलं तपकिरी कोट असलेलं पहिलंच दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वल असल्याचं सांगितलं जात आहे. (PHOTO : मनेशकुमार सज्जन, वनरक्षक, बोर व्याघ्र प्रकल्प)
या अस्वलाचा जन्म बोर व्याघ्र प्रकल्पातच झालेला आहे, कारण 13 मार्च 2020 रोजी शुभम पाटील या पर्यटकाला संबंधितअस्वल 3 ते 4 महिने वयाचे शावक असताना आईसोबत आढळून आलं होतं. (PHOTO : शुभम पाटील, पर्यटक, बोर व्याघ्र प्रकल्प)
दोन शावकापैकी एक काळ्या रंगाचे आणि दुसरा तपकिरी रंगाचे होते. 9 मे 2022 रोजी मला दिसलेल्या दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वलाचे वय सुध्दा जवळपास अडीच वर्षाचे होते. (PHOTO : शुभम पाटील, पर्यटक, बोर व्याघ्र प्रकल्प)
बोर व्याघ्र प्रकल्प आकाराने लहान असला तरी जैवविविधता तसंच वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, सांभर, चितळ, रोही इत्यादी वन्यप्राण्यांच्या अधिवासामुळे हे व्याघ्र प्रकल्प प्रत्येक पर्यटकांचं आकर्षण बनलेलं आहे. बोरमध्ये आढळलेल्या दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वलीने त्यामध्ये आणखी भर टाकलेली आहे. (PHOTO : आर्वी वनक्षेत्रातील ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेले दृश्ये)
न्यप्रेमींकडून मिळालेल्या माहितीनुसार बोर व्याघ्र प्रकल्पात अंदाजे 100 पेक्षाही जास्त काळ्या रंगाच्या अस्वलांचा अधिवास आहे. (PHOTO : आर्वी वनक्षेत्रातील ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेले दृश्ये)
बोर व्याघ्र प्रकल्पात प्रथमच दुर्मिळ ल्युसिस्टिक वन्यप्राणी अस्वल आढळल्याने अनेक वन्यजीव अभ्यासकांसह वन्यजीव प्रेमींमध्ये हे अस्वल पाहण्याची ओढ लागली आहे. जंगल सफारीकडे कल वाढला आहे. (PHOTO : आर्वी वनक्षेत्रातील ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेले दृश्ये)