वसईच्या तहसील कार्यालयात पहिली तृतीयपंथी कर्मचारी
समाजात आपल्याला स्थान मिळवण्यासाठी झगडत असणाऱ्या तृतीयपंथीयांना वसई तहसीलदाराने कंत्राटी स्वरूपात नोकरी देऊन वेगळा पायंडा पाडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवसईच्या सेतू कार्यालयात काम करणाऱ्या आलिया मिलिंद पवार या उच्चशिक्षित तृतीयपंथी तरुणीला काम मिळाल्याने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.
आलिया पवार वसई सेतू कार्यालयात कागदपत्रे स्कॅनिंगचे काम करतात.
आलिया पवार हिने मायक्रोबायोलॉजी विषयात पदवी घेतली आहे. पण ही पदवी घेऊनही तिला त्याचा कोणताही उपयोग झाला नाही.
कारण समाजात तृतीयपंथीयांना पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नसल्याने तिला नोकरीसाठी खूप खस्ता खाव्या लागल्या. पण तिला कोणीच नोकरी दिली नाही.
त्यामुळे तिने तृतीयपंथीयांच्या जोडीला राहून मागून आपला निर्वाह करावा लागला. मागे तहसील विभागाने काही तृतीय पंथीयांना शिधापत्रिकेचे वाटप केले होते.
यावेळी आलियाचा तहसील कार्यालयाशी संबंध आला होता. यावेळी वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांना माहिती मिळाली की आलिया ही उच्चशिक्षित असून तिला काम करण्याची इच्छा आहे.
त्यानुसार तहसीलदार यांनी तिला कंत्राटी स्वरूपात सेतू कार्यालयात नोकरी दिली.
शासनाने प्रत्येक क्षेत्रात तृतीय पंथीयांना नोकरीसाठी जागा राखीव ठेवण्यात यावी. यामुळे तृतीयपंथीयांना सुद्धा समाजात मानाने वावरता येईल, असे आलिया मिलिंद पवार हिने सांगितले.