African Blackwood : 'हे' आहे जगातील सर्वात महागडं लाकूड, एक किलोची किंमत आलिशान कारएवढी
चंदनाचं लाकूड सर्वात महाग लाकडांपैकी एक मानलं जातं. चंदन, लाल चंदन, साग अशा काही झाडांची लाकडं उत्तम प्रतीची असल्यामुळे त्याची किंमत जास्त असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण तुम्हाला माहित आहे का, चंदन हे सर्वात महागडं लाकूड नाही तर त्यापेक्षाही महाग एक लाकूड आहे. या एक किलो लाकडाच्या किमतीमध्ये तुम्ही आलिशान कार विकत घेऊ शकता.
हे लाकूड चंदनापेक्षाही महाग आहे, या एक किलो लाकडाची किंमत आठ हजार पौंड म्हणजेच सुमारे आठ लाख रुपये आहे.
जगातील सर्वात महागडं लाकूड म्हणजे आफ्रिकन ब्लॅकवूड. या लाकडाची किंमत 8 हजार पौंड म्हणजेच 7 ते 8 लाख रुपये प्रति किलो आहे. त्यामुळेचे हे लाकूड सर्वात महागडं लाकूड आहे.
आफ्रिकन ब्लॅकवूड नावाप्रमाणे काळ्या रंगाचं असतं आणि आफ्रिकन भागात आढळतं, त्यामुळेच याला हे नाव देण्यात आलं आहे.
आफ्रिकन ब्लॅकवूड प्रकाराचं झाड जगातील दुर्मिळ मानलं जातं. त्यामुळेच त्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. इतर झाडांच्या तुलनेत ही झाडे खूपच कमी प्रमाणात आहेत, त्यामुळेच त्यांना जास्त मागणी आहे.
आफ्रिकन खंडाच्या मध्य आणि दक्षिणेकडील भागात हे झाड दिसून येतं. यापैकी बहुतेक झाडे आफ्रिकेतील कोरड्या प्रदेशात पूर्व सेनेगलपासून इरिट्रियापर्यंत आणि दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर-पूर्व भागात आढळतात. हे झाड सरासरी 25 ते 40 फूट उंच वाढतं आणि जगातील 26 देशांमध्येच आढळतं.
डॅलबर्गिया मेलेनोक्सिलॉन (Dalbergia melanoxylon) नावाच्या झाडापासून आफ्रिकन ब्लॅकवूड लाकूड मिळतं. या झाडाच्या लाकडाच्या उच्च किंमतीचं एक कारण म्हणजे याची कमी संख्या. हे झाड जगातील दुर्मिळ झाडांपैकी एक आहे.
हे एक झाड वाढण्यास सुमारे 60 वर्षे लागतात. यामुळेच या लाकडाचे दर जास्त आहेत. मर्यादित संख्या आणि मागणी जास्त असल्याने आता या लाकडाची अवैध तस्करीही होते.