Ahmednagar News: मढी यात्रेत भरला गाढवांचा बाजार
अहमदनगरच्या मढी यात्रेत रविवारी गाढवांचा बाजार भरला होता. गाढवांचा बाजार हे मढी यात्रेचे वैशिष्ट्य आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात माळेगाव, नांदेड, जेजुरी, देऊळगाव राजा आणि मढी येथे गाढवांचा बाजार भरत असतो.
आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगण राज्यातूनही मढीच्या बाजारासाठी गाढवांचे व्यापारी येत असतात.
चतुर्थी, रंगपंचमी आणि नाथषष्ठी असा तीन दिवस पूर्वीपासून मढी येथील गाढवांचा बाजार प्रचलित आहे.
गुजरातच्या काठेवाड येथील गाढवांना या बाजारात मोठी मागणी असते.
पांढरे शुभ्र, उंचीला आणि जास्त ओझे वाहण्यासाठी चांगले असल्याने त्याची किंमत जास्त असते.
यंदा काठेवाड प्रांतातून तीनशे गाढवे घेऊन सुमारे महिन्याभराची पायपीट करत गाढवे मढीकडे निघाली होती. वाटेत गाढवे विकत विकत मढीपर्यंत 170 गाढवे शिल्लक राहिली होती.
यातील काही गाढवांना तर 25 हजार रुपयांचा दर मिळाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.रंग, वय, दातांची संख्या, उंची यावरून गावरान गाढवाची किंमत ठरते.
संगमनेर, श्रीरामपूर, बिडकीन, पाटोदा भागातील ग्राहकांची यावेळी बातचीत करताना यंदा बाजारात गाढवांची आवक कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले ठरले.
उत्तराखंड विशेषतः बद्रिनाथ, केदारनाथ, काश्मीरच्या परिसरात या गाढवांना खूप मागणी असते.
लष्कराचे साहित्य डोंगराळ भागात अगदी सहजपणे आणि सुलभपणे वाहतूक करण्यासाठी याच गाढवांची मदत घेतली जाते.