समुद्राचे पाणी खारट का असते रे भाऊ...; मीठ नेमकं येतं तरी कुठून?
समुद्र आणि महासागरांचे पाणी खारट आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु याचे कारण फार कमी लोकांना माहित आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमुद्राचे पाणी इतके खारट आहे की ते पिण्यासाठी अजिबात वापरता येत नाही. समुद्रात इतके मीठ कोठून आले, नक्की जाणून घ्या....
आपल्या पृथ्वीवर जवळपास 70 टक्के पाण्याचा साठा आहे. त्या साठ्यापैकी 97 टक्के पाणी समुद्रात आहे.
अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, महासागरामध्ये इतकं मीठ आहे की जर पृथ्वीवरील महासागरातून संपूर्ण मीठ बाहेर काढलं आणि जमिनीवर पसरवले तर त्याचे जवळपास 500 मीटर उंच थर बनलतील.
समुद्रात मीठाचे दोन स्त्रोत आहेत. महासागरातील बहुतेक मीठ नद्यांमधून येते.
पावसाचे पाणी थोडेसे अम्लीय असते, जेव्हा हे पाणी जमिनीच्या खडकांवर पडते तेव्हा ते नष्ट होते आणि त्यातून तयार होणारे आयन नद्यांमधून महासागरात पोहोचतात. ही प्रक्रिया लाखो-करोडो वर्षांपासून सुरू आहे.
समुद्रात येणाऱ्या मिठाचा आणखी एक स्रोत म्हणजे समुद्रतळातून येणारे थर्मल द्रव. हे विशेष द्रव महासागरातील सर्व ठिकाणाहून येत नाहीत, तर पृथ्वीच्या आतील पृष्ठभागाच्या संपर्कात असलेल्या छिद्र आणि विवरांमधून येतात.
या छिद्रे आणि भेगांद्वारे समुद्राचे पाणी पृथ्वीच्या आतील पृष्ठभागाच्या संपर्कात येते आणि गरम होते. त्यामुळे अनेक प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडतात.