Ganeshotsav 2024 : कोकणातील गणपती दीड दिवसांचा का असतो? वाचा यामागचं वैज्ञानिक कारण

Ganeshotsav 2024 : गणपतीचं विसर्जन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी विविध पद्धतीने केलं जातं.

Ganeshotsav 2024

1/11
गणेशोत्सवाचा सण अगदी उत्साहात, जल्लोषात सुरु असताना बघता बघता अनंत चतुर्दशीचा दिवस जवळ यआला आहे.
2/11
सगळीकडे दीड दिवसांचे, पाच दिवसांचे आणि सात दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झालं आहे.
3/11
पण, तुम्हाला माहीत आहे का, गणपतीचं विसर्जन कितव्या दिवशी करावं याबद्दल वेगवेगळ्या पद्धती आहेत.
4/11
निसर्गमित्र राजेंद्र भट यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणतात, कोकणात प्रामुख्याने दीड दिवसाचा गणपती असतो. तर, घाटाजवळ पाच दिवसांचा. तर, समुद्रापासून दूर कोरड्या हवेत 10 दिवसांचा गणपती असतो.
5/11
हे नेमकं काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर गणपतीच्या मूर्तीत जे जिवाणूंचं कल्चर तयार होणार आहे ते तयार व्हायला कोकणामध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे दीड दिवस पुरेसे असतात.
6/11
घाटावर हवेतील आर्द्रता तुलनात्मक कमी असल्यामुळे तिथे 5 दिवसांचा गणपती असतो.
7/11
जितकं कोरड्या हवेत जाऊ तितका वेळ जास्त लागतो म्हणून तिथे जास्त दिवस गणपती असतात.
8/11
गणपतीचं विसर्जन करताना वाहत्या नदीत किंवा तलावात विसर्जन करावं.
9/11
गणपतीचं विसर्जन करताना बादलीत करावं. आणि उरलेली माती आणि पाणी आपल्या कुंडीतील झाडांना आणि शेतामध्ये टाकावं.
10/11
कल्चर तयार करुन बॅक्टेरिअल कल्चर जमिनीत आणणं यासाठी गणपती आहे.
11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola