पुन्हा 'गंभीर' क्लास; टीम इंडियाचा सराव सुरु, रोहित, कोहलीसह मैदानात कोण कोण दिसले?, Photo's
भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन समान्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. (Photo Credit-BCCI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. चेन्नईत हा सामना खेळवण्यात येणार आहे. (Photo Credit-BCCI)
शुक्रवारी भारतीय संघातील सर्वच खेळाडू चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम मैदानावर एकत्र आले.
प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सर्व खेळाडूंकडून कसून सराव करून घेतला.
विराट कोहलीने 45 मिनिटे नेट्समध्ये फलंदाजी केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने त्याला प्रत्येक प्रकारचे चेंडू टाकले.
कर्णधार रोहित शर्मा आणि कोहलीचे कालच येथे आगमन झाले होते.
नवे गोलंदाजी कोच मोर्ने मोर्कल आणि सहायक कोच अभिषेक नायर यांनी सरावादरम्यान गंभीर यांना सहकार्य केले.
बीसीसीआयने पहिल्या दिवसाच्या सरावाचे फोटो पोस्ट करीत लिहिले, 'उलटगणती सुरू!', टीम इंडियाने रोमांचक स्थानिक सत्राला सुरुवात केली आहे.'
संघातील प्रत्येक खेळाडू प्रशिक्षक गंभीर, सहयोगी स्टाफ आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या सूचना गंभीरतेने घेताना फोटोत स्पष्टपणे दिसत आहे.
भारत डब्ल्यूटीसीमध्ये 68.52 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर असून ऑस्ट्रेलिया ६२.५२ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश संघ 45.83 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे