PHOTO : ...म्हणून प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर असतात रेषा!
प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर बनवलेल्या रेषा तुम्ही पाहिल्या का? का बरं असतील त्या? या रेषांमागे एक खास कारण आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजाणून घेऊया यामागील खास कारण...
घराबाहेर पडताना किंवा कुठेतरी प्रवास करताना तहान लागली की, लगेच आपण दुकानातून पाण्याची बाटली विकत घेतो. या रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्याही आपल्यासाठी खूप उपयोगी पडतात.
पण या बाटल्यांवर रेषा आहेत हे कधी तुमच्या लक्षात आलंय का? या रेषा का बनवल्या जातात याचा कधी विचार केलाय का?
प्लास्टिकच्या बाटलीवरील या रेषा बाटलीच्या सुरक्षेसाठी असतात. या बाटल्या Transparent Disposable Plastic ने तयार केल्या जातात.
हे हार्ड प्लास्टिक नसतं, या पाण्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी सॉफ्ट प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यामुळे या रेषा नसतील तर या बाटल्या ने-आण करताना फुटू शकतात. त्यामुळे या रेषा पाण्याच्या बाटलीचं रक्षण करतात.
जर तुम्हाला वाटत असेल की, या रेषा फक्त डिझाइन म्हणून दिलेल्या असतात, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे.
दरम्यान, प्लास्टिकच्या बाटल्यांवर बनवलेल्या या रेषांमागेही Science दडलेलं आहे. बाटलीवरील या ओळी ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन बनवल्या आहेत. जाणून घेऊयात नेमकं कसं?
तुम्ही ज्यावेळी दुकानातून ती प्लास्टिकची पाण्याची बाटली विकत घेता. त्यावेळी हातात धरताना ग्रिप मिळावी म्हणूनही या रेषा पाण्याच्या बाटलीवर दिलेल्या असतात.