गुरुपौर्णिमेनिमित्त भक्ताचं साईचरणी सोनेरी दान; आंध्रप्रदेशमधील भक्ताकडून साईंना 20 लाखांचा सोन्याचा मुकूट
355 ग्रॅम वजनाचा 20 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट वामसी कृष्णा यांनी साईचरणी अर्पण केलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाईबाबांना गुरू मानणारे लाखो साईभक्त गुरुपौर्णिमेनिमित्त साई चरणी नतमस्तक झाले.
आंध्रप्रदेश येथील साईभक्त वामसी कृष्णा विटला यांनी 20 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केलाय.
दुपारच्या आरतीवेळी हा सोन्याचा मुकुट साईबाबा संस्थानकडे सुपुर्द करण्यात आला.
वामसी कृष्णा आणि त्यांच्या परिवाराच्या इच्छेखातर हा मुकुट आज साईबाबांच्या मुर्तीला परिधान करण्यात आला.
यावेळी साईबाबा संस्थानाच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांच्या हस्ते वामसी कृष्णा आणि परिवाराचा सत्कार करण्यात आला.
वामसी कृष्णा विटला हे बालपनापासून निस्सीम साईभक्त असून ते सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून त्यांनी साईबाबांना सुवर्ण मुकुट अर्पण केल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं.