Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
अरेच्चा...! एक-दोन नव्हे 'या' प्राण्याला आहेत 32 मेंदू, 10 डोळे आणि 300 दात, आयुर्वेदीक उपचार पद्धतीत वापर
काही इतर सजीवांपेक्षा वेगळे असल्यामुळे खास असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्राण्याबद्दल सांगणार आहोत. या प्राण्याबद्दल विशेष म्हणजे याला 32 मेंदू, 10 डोळे आणि 300 दात आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळू हा प्राणी तुम्हाला माहित असेल. याला रक्त शोषणारा जळू, जळवा किंवा लीच (Leech) असंही म्हटलं जातं.
माणूस असो वा प्राणी, प्रत्येकाला मेंदू असतो, पण 'जळू' या प्राण्याच्या शरीरात 1 नव्हे तर 32 मेंदू आढळतात. पण 32 मेंदू असूनही जळू मानवाच्या एका मेंदूची बरोबरी करु शकत नाही.
जळू या प्राण्याला 32 मेंदू असतात. इतकंच नाही तर जळूला 3 जबडे असतात आणि प्रत्येक जबड्याला 100 दात असतात.
या दातांच्या मदतीने ती मानवी शरीरातून रक्त शोषते. आम्ही तुम्हाला सांगतो की जळू त्याच्या वजनापेक्षा 10 पट जास्त रक्त शोषू शकते.
जळूला 10 डोळे असतात. या डोळ्यांद्वारे जळू गडद आहे की प्रकाश हे ओळखते, तसेच वेग आणि आकार याचाही अंदाज जळूला डोळ्यांमार्फत येतो.
जळूचे शरीर 32 तुकड्यांमध्ये विभागलेले असते, हे तुम्हाला जळूचं शरीर पाहिल्यावर कळेल. जळूला या प्रत्येक भागात एक स्वतंत्र मेंदू असतो.
मूळात हे 32 मेंदू नसून एकच मेंदू आहे, जो 32 तुकड्यांमध्ये विभागलेला गेला आहे. 32 तुकड्यांमध्ये विभागलेलं असलं तरीही जळूचे शरीर जोडलेलं असतं.
जळूच्या 32 भागांपैकी प्रत्येक भागाची स्वतःचं गॅंग्लिया (Ganglia) म्हणजे एक प्रकारचा मज्जातंतू (Nervous System) असतो, या द्वारे प्रत्येक भाग एकमेकांसोबत जोडलेला असतो.
जळू म्हणजे जळवा (Leech) माणूस आणि जनावराचं रक्त शोषण्यासाठी ओळखला जातो. रक्त शोषणारा हा जळू आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.
काही विशिष्ट प्रकारच्या वळूंचा विविध आजारांवरील उपचारासाटी वापर केला जातो, याला लीच थेरपी असं म्हणतात.