वर्धा बोगस बियाणे प्रकरण, 10 आरोपींना अटक
वर्धा बोगस बियाणे प्रकरणी (Wardha bogus seed case) दिवसेंदिवस नव नवीन खुलासे होत आहेत. आत्तापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्ध्याच्या म्हसाळा इथं सापडलेल्या बोगस कपाशी बियाणे रॅकेटमधील आरोपीच्या घरी मोठी रोकड सापडली आहे.
सेलू तालुक्याच्या रेहकी येथील आरोपी राजू जयस्वाल याच्या घरातून पोलिसांनी 28 लाख 20 हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
रेहकी येथील आरोपी राजू जयस्वाल याच्या घरातून जप्त करण्यात आलेली 28 लाख रुपयांची रोकड ही बोगस बियाणे विक्रीतून आली असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये आणखी आरोपी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 10 आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वर्धा (Wardha) जिल्ह्यातील म्हसाळा इथं कोट्यवधी रुपयांच्या बोगस बियाणे (Bogus seed) निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पोलीस आणि कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे.
या बनावट बियाणे विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तपास लावला आहे.
याप्रकरणात सेवाग्राम पोलिसांनी 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन आठ आरोपींना अटक केली होती. याच प्रकरणात पुन्हा दोघांना अटक करण्यात आल्याने अटक आरोपीची संख्या दहावर पोहोचली आहे.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने वर्धा जिल्ह्याच्या हमदापुर येथून एका पशुवैद्यकीय डॉक्टरलाही अटक केली आहे.