Strawberry Moon 2023 : आकाशात दिसला 'स्ट्रॉबेरी मून', फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पाहा याची एक झलक
पौर्णिमेला जगभरातील लोकांनी आकाशात स्ट्रॉबेरीप्रमाणे चमकणाऱ्या चंद्राचं रुप डोळ्यात कैद केलं. अनेकांनी हा क्षण त्यांच्या मनात तर काहींनी कॅमेऱ्यात कैद केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवटपौर्णिमेला हा खास योग आला होता. याचे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. जगभरातील लोकांनी हा खास 'स्ट्रॉबेरी मून' पाहण्याचा आनंद घेतला.
'स्ट्रॉबेरी मून' ला 'रोझ मून' (Rose Moon) असंही म्हटलं जातं. इंटरनेटवर नेटकऱ्यांनी चंद्राचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये गुलाबी रंगाचा चंद्र रात्रीच्या आकाशात चमकताना दिसत आहे.
चंद्र (Moon) पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो. चंद्र त्याच्या कक्षेत सर्वात जवळ किंवा दूर असणे याला 'अप्सिस' (Apsis) असं म्हणतात.
चंद्र पृश्वीभोवती (Earth) त्याच्या कक्षेत जवळ आला तर तो आकाराने मोठा दिसतो. याउलट चंद्र पृश्वीभोवती त्याच्या कक्षेत दूर गेला तर तो आकाराने लहान दिसतो. ज्या दिवशी चंद्र पृथ्वीला प्रदक्षिणा करताना कक्षेत सर्वात जवळ येतो, त्यामुळे आकाराने मोठा दिसतो. याला सूपरमून किंवा स्ट्राबेरी मून असंही म्हणतात.
दरम्यान, युरोपमध्ये याला 'रोझ मून' म्हणतात. यासोबतच 'स्ट्रॉबेरी मून'ला 'हनी मून' आणि 'हॉट मून' या नावांनीही ओळखलं जातं.
आणखी एका रिपोर्टच्या मते, जून महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या रंगाशी 'स्ट्रॉबेरी मून'चा काही संबंध नाही, हे प्राचीन परंपरेशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.
इंटरनेटवर नेटकऱ्यांनी चंद्राचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये गुलाबी रंगाचा चंद्र रात्रीच्या आकाशात चमकताना दिसत आहे.