Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड शहराचं 'जिजाऊनगर' नामकरण करण्याची मागणी, पिंपरी-चिंचवडमध्ये 100 हून अधिक होर्डिंग्ज
राज्यात शहरांच्या नामकरणाचं लोण सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यातच आता पिंपरी-चिंचवड शहराचं नामकरण 'जिजाऊनगर' करण्याची मागणी होतेय.
ही मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानने केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत भक्ती शक्ती प्रतिष्ठानने ही मागणी केली आहे.
एवढंच नाही तर नामकरणाच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये 100 हून अधिक होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.
यामध्ये सहभागी होण्यासाठी लाईक करा आणि मिस कॉल द्या अशी मोहिम राबवण्यात आला आहे.
इथल्या मातीत उमटली आहेत पाऊले त्यांची इथल्या वाऱ्याने झेलले आहेत श्वास नि:श्वास त्यांचे इथल्या पाण्यात मिसळला आहे घाम त्यांच्या परिश्रमाचा आता होउ दे या आसमंतात जयजयकार त्या नावाचा आता पिंपरी चिंचवडचे नामकरण जिजाऊनगर करूया असे पोस्टरवर लिहिले आहे.
त्यामुळे शहरात नामकरणाची चर्चा रंगू लागलीय.
राज्यात अहमदनगरचं अहिल्यानगर, काही दिवसांपूर्वी औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्यात आले आहे.
त्यानंतर आता पिंपरी चिंचवडच्या नामांतराची मागणी जोर धरु लागली आहे