Balasore Train Accident: 288 मृत्यू, 1100 हून अधिक जखमी; तब्बल 51 तासांनी पहिली ट्रेन रवाना, रेल्वेमंत्री भावूक
ओडिशाच्या (Odisha) भीषण अपघातानंतर तब्बल 51 तासांनी बालासोर (Balasore Train Accident) येथील अपघातग्रस्त (Accident) भागातून पहिली ट्रेन रवाना झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अनेक माध्यमांचे प्रतिनिधी आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती. तसेच, ज्या रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी भीषण अपघात झाला होता, त्याच रेल्वे ट्रॅकवरुन मालगाढी रवाना झाली.
यावेळी रेल्वेमंत्री भावूक झाले. ते म्हणाले की, बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबीयांना भेटता यावं, हा आमचा उद्देश आहे. ते लवकरात लवकर सापडावेत. आमची जबाबदारी अजून संपलेली नाही. ज्या बालासोरमध्ये रेल्वे अपघात झाला, तिथे 24 तास युद्धपातळीवर काम सुरू होतं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) घटनास्थळी उपस्थित होते. शेकडो रेल्वे कर्मचारी, एनडीआरएफची पथकं, तंत्रज्ञांपासून ते इंजिनिअर्सपर्यंत सर्व रात्रंदिवस काम करत होते.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट केलं की, अपघातग्रस्त डाऊन लाईन पूर्णपणे पूर्ववत करण्यात आली आहे. या भागातून पहिली ट्रेन रवाना झाली आहे. तसेच, या ट्वीटनंतर काही वेळानं त्यांनी पुन्हा एक ट्वीट केलं आणि सांगितलं की, अप-लाईनवरही ट्रेनची वाहतूक सुरू झाली आहे.
तब्बल दोन दिनसांनी अपघातग्रस्त भागातून ट्रेन रवाना झाली. आता या ट्रेनचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे.
बयाना रेल्वे स्थानकावरुन ट्रेन जाताच रेल्वेमंत्र्यांनी हस्तांदोलन केलं, त्यानंतर ट्रेनकडे पाहुन रेल्वेमंत्र्यांनी हात जोडले आणि प्रार्थनाही केली. यावेळी रेल्वेमंत्री काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
तब्बल दोन दिवसांनी अपघातग्रस्त भागातून ट्रेन रवाना झाली. आता या ट्रेनचा व्हिडीओही समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. बयाना रेल्वे स्थानकावरुन ट्रेन जाताच रेल्वेमंत्र्यांनी हस्तांदोलन केलं, त्यानंतर ट्रेनकडे पाहुन रेल्वेमंत्र्यांनी हात जोडले आणि प्रार्थनाही केली. यावेळी रेल्वेमंत्री काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
रेल्वेमंत्र्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन व्हिडीओ शेअर केला आहे. एका व्हिडीओमध्ये ट्रेन रवाना होताना रेल्वेमंत्री 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम' अशा घोषणा देताना दिसत आहेत. तसेच, लोकांचे आभार मानताना दिसत आहेत.
ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला तर, 1000 हून अधिक जण जखमी झाले.
सध्या शेकडो जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
2 जून रोजी ओडिशामध्ये तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला. यामध्ये शेकडो लोकांना जीव गमवावा लागला.
2 जून रोजी ओडिशामध्ये तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला. यामध्ये शेकडो लोकांना जीव गमवावा लागला.