Facts: येत्या 20 वर्षांनंतर आकाशात तारे दिसणार नाहीत? पाहा काय सांगतात शास्त्रज्ञ...
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रकाश प्रदूषणामुळे येत्या 20 वर्षात लोकांना तारे दिसणार नाहीत. मोबाईल, लॅपटॉप, शोरूम्सच्या बाहेरील एलईडी डिस्प्ले, कारचे हेडलाइट्स आणि चमकदार होर्डिंग्ज यांसारख्या कृत्रिम दिव्यांमुळे हे प्रदूषण घडतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रकाश प्रदूषणामुळे रात्रीच्या आकाशाची चमक दरवर्षी 10% वेगाने ढासळत आहे.
खगोलशास्त्रज्ञांनी 2016 मध्ये सांगितलं की, प्रकाश प्रदूषणामुळे जगातील 75% पेक्षा जास्त लोक आकाशगंगा पाहू शकत नाहीत. 250 तारे दिसणार्या भागात जन्मलेल्या मुलाला 18 वर्षांनंतर केवळ 100 तारेच दिसू शकतील, असं जर्मन शास्त्रज्ञ ख्रिस्तोफर कायबा यांनी सांगितलं.
प्रकाश प्रदूषणामुळे केवळ अवकाशीय दृश्यमानतेवरच परिणाम होत नाही, तर पर्यावरणीय धोकाही निर्माण होतो. शांघाय, यूएस आणि युरोपमधील 99% लोक प्रकाश-प्रदूषित आकाशाखाली राहतात, त्यांना तारे फार कमी दिसतात.
प्रकाश प्रदूषणाचा कीटक, पक्षी आणि विविध प्राण्यांवर परिणाम होतो, त्यांचं जीवन चक्र विस्कळीत होतं आणि जगभरातील जैवविविधतेचं लक्षणीय नुकसान होतं. प्रकाश प्रदूषणामुळे मधुमेहाचा धोका 25% वाढतो, ज्यामुळे शरीराच्या इन्सुलिनच्या नियमनावर परिणाम होतो.
कृत्रिम प्रकाशामुळे ग्लुकोजची पातळी वाढू शकते, विशेषत: सतत संपर्कात असलेल्यांसाठी, ज्यामुळे बीटा पेशींची क्रिया आणि इन्सुलिन स्राव कमी होतो. कृत्रिम प्रकाशाचा अतिरेक ही आधुनिक समाजासाठी एक मोठी समस्या बनली आहे आणि मधुमेहाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे.