India: एक ऑगस्टपासून होणार 'हे' आर्थिक बदल; तुमच्या 'खिशा'वर कसा होणार परिणाम? पाहा...
ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी आहे, कारण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल झाले आहेत. व्यावसायिक LPG सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App31 जुलै 2023 ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख होती, त्यामुळे या तारखेपर्यंत ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल, त्यांना आता रिटर्न भरायचा असल्यास दंडाची रक्कम भरावी लागेल. यात एक ते पाच हजारांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तींसाठी बातमी आहे. अॅक्सिस बँक आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करणाऱ्यांना 12 ऑगस्ट 2023 पासून क्रेडिट कार्डवरून खरेदी करताना कमी कॅशबॅक मिळणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 ही आहे. ही योजना 400 दिवसांची एक खास मुदत ठेव योजना आहे. त्यात गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना 7.1 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के दराने व्याज मिळणार आहे.
ऑगस्ट महिन्यात सण-उत्सव जास्त प्रमाणात आहेत, त्यामुळे एकूण 14 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या सुद्धा मोजण्यात आल्या आहेत. बँकांना सुट्टी असली तरी अनेक कामं ऑनलाईन माध्यमातून करता येतील.