Samruddhi Mahamarg : ठाण्यात मोठी दुर्घटना, समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना अपघात; 17 जणांचा मृत्यू
ठाण्याजवळ शहापूर (shahapur) तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळली आहे. यामध्ये आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
चार ते पाच जण जखमी झाले आहेत. आणखी सहा जण गर्डर मशिनच्या खाली अडकल्याची शक्यता आहे.
राज्याचे रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेच दिली. गर्डर मशिनखाली दाबले गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास प्रथम प्राधान्य देत आहोत. ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल. तसेच मतृांच्या कुटुंबीयांना मदत देखील केली जाईल असे दादा भुसे म्हणाले.
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्देवी घटना घडली आहे. शाहपूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे.
गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली. यामध्ये 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे.
मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या NDRF कडून डॉग स्कॉडच्या माध्यमातून पुलाच्या ढिगाराखाली सर्च ऑपरेशन सुरु आहे. आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.